Maha Information

Maha Information

PM कुसुम सोलर पंप योजना 2023 - kusum solar yojna Maharashtra

PM कुसुम सोलर पंप योजना 2023 - kusum solar yojna Maharashtra 💥दिनांक. १७ मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात आलेल्या कुसुम सोलर पंप योजना 2023. यासाठी www.mahaurja.com संकेतस्थळावर भेट देऊन योजने अंतर्गत अर्ज सादर करता येईल. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाऊर्जामार्फत करण्यात येत आहे.

👉नवीन नोंदणी करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला www.mahaurja.com ( महा कृषी ऊर्जा अभियान ) ही वेबसाइट ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपले गाव या योजनेसाठी पात्र आहे का नाही ? ते पाहण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या safe village list मध्ये आपल्या गावाचे नाव आहे का ते पहावे लागेल.

योजनेचा मुख्य उद्देश 
शेतक-यांसाठी कुसुम सोलरपंप योजना चालू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतक-यांना दिवसा शेतीतील पिकांसाठी पाणी देता यावे, त्यामुळे केंद्र सरकार व राज्यशासनामार्फत डिझेलवर चालणारे जे इंजिन आहेत त्यांचे रुपांतर आता सौरउर्जेवर चालणा-या सौरपंपामध्ये होणार आहे. तरि आजच्या ब्लॉग मध्ये आपन कुसुम सोलार पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जानुन घेणार आहोत.

ऑनलाईन  फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?

1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
3.सात-बारा
4. पासपोर्ट फोटो

👉सातबा-यावरती विहीर, बोअरवेल ची नोंद असणे आवश्यक.

शेतक-याच्या नावी किती एक्कर जमीन असल्यावर किती HP चा पंप मिळणार? 

3 HP पंप  अडिच एक्कर च्या आत मध्ये

5 HP पंप   अडिच एक्कर ते 5 एक्कर

7.5 HP पंप  5 एक्कर च्या पुढे

कुसुम सोलर पंप अर्ज कसा भरणार या बद्दल सविस्तर माहिती

स्टेप 1
सर्व प्रथम आपले आधार नंबर टाकुन त्यानंतर आपले राज्य निवडून आपली शेतजमीन असलेला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तालुका निवडून गावाचे नाव निवडायचे आहे. 
जिल्हा तालुका व गाव तेच निवडा ज्या मध्ये तुमची जमीन आहे. 

स्टेप 2
आपला चालु नंबर ज्यावर ओटीपी येईल हा नंबर टाकुन, आपल्या जातीचा प्रवर्ग निवडावा लागेल.


स्टेप 3
Process For Payment वर क्लिक केल्यानंतर आपल्याला १०० रु नोंदनी फीस ऑलनाईन भरावी लागेल.

स्टेप 4
नोंदणी फिस भरणा केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर युजरनेम आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्याआधारे आपल्याला पोर्टलवर लॉगिन करुन वरिल दिलेली आवश्यक ती कागदपत्रे आपलोड करावी लागतील. 

स्टेप 5
कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर आपला अर्ज पुर्णपने भरला जातो. यानंतर तुम्हाला काही दिवसाच्या कालावधीमध्ये पेमेंट करण्यासाठी पोर्टल वरती ऑप्शन येते, पेमेंट केल्याच्या नंतर कंपनी निवडावी लागते. अशा प्रकारे कुसुम सोलार पंप योजनाची संपुर्ण प्रक्रिया असते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.